तेरी बेवफाई I Teri Bewai I हिंदी भावनिक कविता

गले से लगाये थे 
तेरे सारे गम 
तेरी बेवफाई का 
असर है अब कम

तू तो भुली सारी 
क़समें जो खायी 
दिल पे गमों की 
उदासी थी छाई  
मर ही जाते गर 
सहते ना गम
तेरी बेवफाई का 
असर है अब कम  

माना के निकली 
थी तू हरजाई  
यादों ने तेरी 
वफायें निभाईं 
यादों का जहर पुरा
पी गये है हम  
तेरी बेवफाई का 
असर है अब कम

जुदाई में तेरी 
रातें थी रोयी  
यादों से तेरी 
निंदे थी खोयी 
संभलते नही ख़ुद तो 
निकल जाता दम  
तेरी बेवफाई का 
असर है अब कम  

बड़े ही हसीन थे 
गुजरे हुए दिन
जी रहे खुशी से 
अब तुम्हारे बिन 
बिती यादों से कभी 
आँखे होती है नम
तेरी बेवफाई का 
असर है अब कम

रचना – डॉ सुभाष कटकदौंड, खोपोली 

Posted in हिंदी कविता / Hindi Poems | Tagged , , , , , | 1 Comment

कालबाह्य होळी अजुनही पेटते…


बुद्धी ठेवुन गहाण 
लाकडे त्यांनी रचली 
उदार मनाची होळी 
            जळण्यास होती सजली  
कालबाह्य झाल्या आता 
प्रथा त्या अग्निपुजनाच्या
नाही कळत का आठवणी  
         अजुनही त्या होलिकेच्या ?
म्हणे वासना, अहंकार,अविचार
असतात होळीत जाळायचे 
का प्रतिकात्मक फसवे आधार 
              नाहक धर्माला जोडायचे ?
पर्यावरण, प्रदूषणावर  
होते बोलत ते भरभरून 
होळीला हात जोडत होते 
                  थोडं दुर उभा राहुन 
नैवेद्याची ती पुरणपोळी 
अग्नीत भस्म झाली 
भुकेल्याची नजर तेंव्हा 
             जणु हाय देवुन मेली
काळा उठलेला धूर 
भयानक मला वाटला 
गलिच्छ शिव्यांचा गोंधळ 
                बिभत्स मला भासला 
काही ठिकाणी प्रथा 
होमाची ती अघोरी 
आठवुण जिवंत बळी 
                आली मला शिसारी 
सर्पण आणि सरणातला 
भेद होता मला कळला  
पण होळी आणि चितेतला
               फरक हळुहळू जळला.

डॉ .सुभाष कटकदौंड 

Posted in मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, वेगळी कविता I Different Poem, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , , , | Leave a comment

वारं मनातलं

नको ते वाद 
निरर्थक संवाद 
बेछूट तो हल्ला 
मनं ती कापणार

नको तो झंझावात 
वादळ ते घोंगावणार 
मनात चाललेलं द्वंद्व 
कसं शांत होणार ?

नको वेडी आशा 
व्यर्थ त्या अपेक्षा 
नको ती निराशा 
जिवघेणी उपेक्षा

अपेक्षाभंगाचं शल्य 
मनाला कुरतडणार 
तुटलेला तो भरोसा 
काळीज चिरणार

नाजुक भावनांना 
अव्यक्त संवेदनांना  
नाजुक असं ते मन 
किती काळ जपणार ?

अव्यक्त ते मन 
आतल्या आत गुदमरुन 
दम कोंडुन कधी
मुक्यानेच रडणार  

आक्रोशाचा लाव्हा  
पेटून उठणार 
कोवळ्या मनाला 
बेचिराख करणार 

मनातलं काहुर 

मनाच्या नकळत 
अगदी दुरवर 
सभोवताली पसरणार

वारं मनातलं 
पश्चात्ताप करत 
अगदी हलकेच 
डोळ्यांना भिजवणार 

मायेच्या फुंकरेनं 
अहंकाराला सारुन 
मनातलं वादळ 
थोडसं शांत होणार 

काळाच्या स्पर्शाने 
आत्मपरीक्षण करत 
गैरसमज मनातले 
सारे ते मिटणार 

मनाचं मनाशी 
पेटलेले तुफान 
समजुतदारपणे 
आपसुकच शमणार 

रचना – डॉ. सुभाष कटकदौंड – खोपोली 

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior | Tagged , , , , , , , , , , | 1 Comment

शब्दांचे बदलते रंग I शब्दांवर कविता I Poem on Words

आवाजाच्या चढउताराला 
होते ते घाबरले 
सरल साध्या शब्दांचे 
रंग होते बदलले 

शब्दांना ज्यांनी त्यांनी 
हवे तसे जोडले 
जसे हवेत तसे 
अर्थ त्यांनी काढले 

कधी संतापुन शब्दांकडे 
रागाने मी बघितले 
बिथरले ते बिचारे 
ओळख स्वतःची विसरले 

सरल साध्या शब्दांनी 
रंग होते बदलले 
कधी नकळत जिभेवरुन 
शब्द होते घसरले 

भात्यातुन सुटलेले बाण ते 
विध्वंस करत पसरले 
विवश होउन कधी 
शब्द होते ते गहिवरले 

वाटलं होतं तेंव्हा जणु
संवाद सारे संपले 
ओळखीचे सारे शब्द 
अपरिचित तेंव्हा भासले  

सरल साध्या शब्दांचे 
रंग होते बदलले 
निष्ठूरपणे कधी मी 
शब्द फेकुन मारले 

उलटुन आलेले शब्द 
मला धार धार वाटले 
कळलं नाही कसे 
शब्द मी तोडले 

जन्मा जन्मीचे नाते 
विनाकारण मोडले 
सरल साध्या शब्दांनी
अर्थ होते बदलले 

सरल साध्या शब्दांचे 
रंग होते बदलले  
माफीचे शब्द मला 
नाही शोधुन सापडले 

कळलं नाही कसे ते 
अहंकाराच्या मागे लपले 
ओठांवरचे शब्द 
ओठांवरच रेंगाळले 

विरहात शब्द गळ्याशी 
घुटमळत राहिले 
उदास शांत शब्द 
निशब्द मला भासले 

सरल साध्या शब्दांचे 
रंग होते बदलले  

प्रेमाने बोललो तसे 
शब्द जवळ बसले 
निरागस ते तेंव्हा 
ह्रुदयात होते हसले 

शब्दांची स्तुती सुमने 
मी इतरांवर उधळले 
गंधानी त्यांच्या 
मन माझे मोहिले 

सरल साध्या शब्दांचे 
अर्थ होते खुलले  
सरल साध्या शब्दांचे 
रंग होते फुलले 

रचना – डॉ. सुभाष कटकदौंड – खोपोली 

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, वेगळी कविता I Different Poem, वेगळी कविता II Vegali Kavita | Tagged , , , | Leave a comment

मनात दडलेलं घरटं 


साफ होत चालली आहेत
जुन्या आठवणींची जळमटं
पण नाही हरवलं अजुनही
मनात दडलेलं घरटं 

साध्या सुंदर खेळांनी
अंगण जायचं दंगुन
सुरस त्या गोष्टींनी
बालपण गेलं होतं रंगुन
रम्य ते बालपण आता
सोडुन गेलंय एकटं
पण नाही हरवलं अजुनही
मनात दडलेलं घरटं 

कधी कधी रंगायचा
खेळ तो पाठशिवणीचा
आनंद होता तो वेगळाच
गाण्यांच्या भेंड्यांचा
विसरुन गेलोय खेळतानाच
भांडण ते नकटं
पण नाही हरवलं अजुनही
मनात दडलेलं घरटं 

मांडीला मांडी लावुन
पंगत होती बसत
ताटामधे खरखटं
नव्हतं कधी दिसत
प्रशस्त मोठं घर नवं
वाटु लागलंय आता खुरटं
नाही हरवलं अजुनही
मनात दडलेलं घरटं 

पिवळ्या त्या भाताची
चवच होती न्यारी
शिळी कडक भाकरी
आईला होती प्यारी
अजुनही मन हेलावते आठवुन
आईबाबांचे ते कष्ट
नाही हरवलं अजुनही
मनात दडलेलं घरटं 

घातली होती कधी
जुन्या पुस्तकांना कव्हर नवी
आठवते अजुनही आवडीची
जुन्या पानांची ती वही
आठवतात ते बाबांचे
झिजलेल्या काॅलरचे शर्ट
नाही हरवलं अजुनही
मनात दडलेलं घरटं 

लुगडे जोडुन शिवलेली
गोधडी आता विरली
मायेची ती ऊब पुन्हा
नाही कधी लाभली
उडुन गेलं कसं भुरकन
बालपण ते भुरटं
नाही हरवलं अजुनही
मनात दडलेलं घरटं 

लहानपणीच्या त्या गप्पागोष्टी
ऐकु येताहेत अस्पष्ट
पण नाही हरवलं अजुनही
मनात दडलेलं घरटं 

रचनाडाॅ. सुभाष कटकदौंडखोपोली 

Posted in कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind | Tagged , , , , , , , | Leave a comment

शर्यत ही जीवनाची…I Life is Race I Energetic Poem

स्वप्नांना नसते लांबी रूंदी 
   स्वप्नांना असते उंची 
पूर्तीसाठी हवी स्फूर्ती 
          अन् जिद्द हवी ती मनची 
उपयोगाचा नाही तो 
   नुसताच पोकळ ध्यास 
यश मिळवायचे असेल 
               तर हवा मग अभ्यास 
प्रामाणिकपणे आपण 
   करत रहायचे प्रयत्न 
यश मिळेल नाही मिळेल 
                नाही करायची खंत 
प्रयत्नांत नको धरसोड 
   हवे नेहमी सातत्य 
भान नाही ढळावे 
             नाही सोडावे तारतम्य 
नाही पडावे कधी आहारी 
   फसवे ते मार्ग भ्रष्ट
आनंदी मनाने सोसावेत 
           जितकेही पडतील कष्ट 
जिवनाच्या ह्या शर्यतीला 
   नसतो कधी अंत 
उघड्या डोळ्यांनी पहावं 
                अन् मन ठेवावं शांत 
Written by Dr Subhash Katakdound 

Posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, स्वप्नांवर कविता / Poems on Dreams | Tagged , , , , , , , , , , | Leave a comment

मनातले अभद्र विचार…I Manatale abhadra Vichar I Poem on Social Issue

सुंदर अश्या नैसर्गिकतेकडे 
डोळे तुमचे वळणार रे 
पण मनातल्या अभद्र विचारांना 
घाला तुम्ही लगाम रे 
पैहरावाला विनाकारण 
का दोष सारे लावता ?
असते महाभयंकर 
डोळ्यांची ती पारदर्शकता 
मनाची सुंदरता तुम्हाला 
कधी कळणार रे ?
मनातल्या अभद्र विचारांना 
घाला तुम्ही लगाम रे 
तुमच्याच सोयीने असते 
का रे ती अनैतिकता 
कधी बदलणार तुमची 
बुरसटलेली मानसिकता 
अजुन किती दिवस तुम्ही 
स्त्रित्वाला छळणार रे ?
मनातल्या अभद्र विचारांना 
घाला तुम्ही लगाम रे 
स्त्रीला कळते आपसुकच 
आरपार ती नजर 
खूप केले आहे सहन 
तिनं रे आजवर 
भावनांशी तिच्या तुम्ही 
अजुन किती खेळणार रे ?
मनातल्या अभद्र विचारांना 
घाला तुम्ही लगाम रे 
विधात्याची सुंदर भेट 
तनाची ती सुंदरता 
नर आणि मादी 
क्षणिक ती भावना 
निर्मळ ती मानवता 
कधी तुम्हा उमजणार रे ?
मनातल्या अभद्र विचारांना
घाला तुम्ही लगाम रे 

रचनाडॉ. सुभाष कटकदौंड 

Posted in मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita | Tagged , , , , , | Leave a comment

तु माझी झालीस I Intense Love I प्रेम कविता

रोज होतीस भेटत 
पण तेंव्हा वेगळी वाटलीस 
कळलं नाही मला 
तू कधी माझी झालीस

सुर्यास्त पहाण्याचा 
तुला होता छंद 
माझ्या निर्मळ प्रेमाचा 
नव्हता तुला गंध 
त्या संध्याकाळी तू
खुप वेळ थांबलीस 
बोलता बोलता अचानक 
थोडी तू अडखळलीस 
कळलं नाही मला 
तू कधी माझी झालीस

मावळत्या प्रकाशात 
चेहऱ्यावर तुझ्या लाली 
अंधुकश्या उजेडात 
लाज पसरलेली गाली 
नेहमी बडबडणारी 
तू शांत तेंव्हा होतीस 
चोरट्या तिरक्या नजरेने 
पहात तू हसलीस 
कळलं नाही मला 
तू कधी माझी झालीस

सुर्य गेला क्षितिजाआड 
कि पाठ तुझी फिरायची 
पण त्या दिवशी नव्हती 
घाई तुला जाण्याची 
क्षितिजाचे ते रंग 
न्याहाळत तू राहिलीस 
गुढ वेगळ्या विचारात 
होती तू हरवलीस 
कळलं नाही मला 
तू कधी माझी झालीस

बावरलेली तुझी नजर 
नव्हती माझ्याकडे वळली 
मनातली तुझ्या चलबिचल 
होती ग मला कळली 
माझ्या शेजारी येवुन 
आपसुकच तू बसलीस 
नेहमीचा तो स्पर्श 
पण तू थोडी शहारलीस 
कळलं नाही मला 
तू कधी माझी झालीस

तू हलकेच टेकवलेस 
डोकं माझ्या खांद्यावर 
तरंगत असलेलं तुझं मन 
होतं विसावलं माझ्यावर
बंधनं सारी झुगारून 
मला तू बिलगलीस 
पापण्या मिटुन डोळ्यांच्या 
प्रेमाची तू कबुली दिलीस
कळलं नाही मला 
तू कधी माझी झालीस 
कळलं नाही मला 
तू कधी माझी झालीस

रचना – डाॅ सुभाष कटकदौंड – खोपोली 

Posted in प्रेम कविता / Prem Kavita, स्नेहभावाच्या कविता / Snehbhavachya Kavita | Tagged , , , , , | 5 Comments

ओझं…एक कथा I Emotional Poem on Mother I आईची आठवण I Kavita Aaivar

आठवतय ना आई तुला, 
आपण तेंव्हा होतो 
छोट्या गावात रहायला 
शिक्षणासाठी बाहेर मी 
यायचो चार दिवस घराला 
एका सुट्टीत झाली होती 
माझी परतीची वेळ 
अन् बाबा होते परगावाला 
आई, तू पदर खोचून 
लागलीस मग तयारीला 
मी होतो काळजीत 
अन जरासा चिंतातूर
कारण बस स्टॉप होते 
घरापासून थोडे दूर 
माझ्या साऱ्या सामानांचे
थोडे जास्तच होते वजन 
जावं लागणार होतं चालत 
ना रिक्षा ना वाहन 
पुस्तकाचं जड ओझं
घेतलंस तू डोक्यावर 
भासलं, माझं ओझं 
घेतलंस तू खांद्यावर 
जबाबदारीच ओझं घेऊन 
आत्मविश्वासाने चाललीस 
जाणवलं मला तेंव्हा,
तू माझा बाप झालीस
पण आई…
जेंव्हा बाबा अचानक 
कायमचे सोडून गेले 
तुझ्या दूःखाचं ओझं
नाही ग मी उचलले 
विरहाच्या त्या आघाताने 
माझेच पाय लटपटले 
खचलेलं तुझं ते मन 
नाही ग मला समजले
चुकांचे ते ओझे आता 
खुपच ग जड झाले 
का गेलीस तू न सांगता 
कोडं आज उमजले 
नकळत झाली ग चुक 
माफ कर तू मला 
ये तू माघारी आता 
अन् पोटात घे ग मला

डाॅ. सुभाष कटकदौंड – खोपोली 

Posted in आईच्या कविता / Aaichya Kavita, कविता आठवणींच्या / Kavita Aathvinichya, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, विरह कविता / Virah Kavita, स्त्रीशक्तीवर कविता I Poem on Woman empowerment | Tagged , , , , | Leave a comment

दूःख तिचे I Dukhh Tiche I Sad Sentimental Poem

दूःख तिचं जाणणारे 
होते जेंव्हा दुरावले
तिच्या दूःखी मनाला 
तिनेच होते सावरले 
रूसलेले डोळे तिचे 
हास्य होते विसरले 
दूःख कोरड्या डोळ्यातले 
नाही कोणा दिसले 
जवळचे ते सारे 
अपरिचित तिला भासले 
तिच्या दूःखी मनाला 
तिनेच होते सावरले 
मनातलं दूःख तिनं 
नाही ओठांवर आणले 
गालावरच्या हास्यात 
वेदनेला खोल लपवले 
चेहऱ्यावरचे सारे भाव 
होते तिने मिटवले 
तिच्या दूःखी मनाला 
तिनेच होते सावरले 
जुन्या त्या आठवणींनी 
डोळे होते भरले 
न ओघळणारे अश्रु 
डोळ्यातच होते मुरले 
जड झालेले डोळे तिने
अलगद शांत मिटले 
तिच्या दूःखी मनाला 
तिनेच होते सावरले 
तुटलेले सुंदर स्वप्न 
मन नव्हते विसरले 
कोलमडलेले आयुष्य 
धिराने तिने उभारले 
दूःख तिचं जाणणारे 
जवळ तिच्या बसले 
तिचे वाहणारे अश्रु 
मग नाही तिने पुसले

रचना – डाॅ. सुभाष कटकदौंड – खोपोली 

Posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, विरह कविता / Virah Kavita | Tagged , , , , , | 2 Comments