जुने-नवे कॅलेंडर I Old Calendar Poem I नववर्षाचे स्वागत I Happy New Year

कळले नाही कसे 
बघता बघता वर्ष संपले 
जुन्या त्या आठवणींत 
मन होते अडखळले 
भिंतीवरचे जुने 
चित्राचे ते कॅलेंडर
कोणीतरी उतरवले 
जुन्या गोड 
त्या आठवणींनी 
मन होते भरले 
भिंतीवरचे कालनिर्णय 
आज निस्तेज वाटले 
नववर्षाच्या येण्याने 
मन नव्हते फुलले 
वाटलं जणु एक आयुष्य 
आज पुन्हा एकदा संपले 
शेवटी शेवटी होतो 
दिवस मी मोजत 
भिंतीवरच्या 
कालनिर्णयाकडे 
उदास एकटक बघत 
शेवटच्या पानाची 
फडफड होती जाणवत 
पुर्वी कसं वर्ष संपताना 
जात होतो हर्षुन 
जुन्या कॅलेंडरकडे 
पहात नव्हतो ढुंकून 
आज मात्र 
भिंतीवरचे कालनिर्णय
नाही मी उतरवले 
भूतकाळाला वर्तमानाच्या 
जवळ मागे दडवले 
जणु जुन्या आठवणींना 
नाजुकपणे जपले 
मुलांच्या त्या आनंदाला 
डोळे भरून बघितले 
तरूणाईकडुन जीवन 
पुन्हा भरून घेतले 
जुन्या-नव्या कॅलेंडरकडे 
प्रेमाने मी पाहिले 
नववर्षाचे स्वागत 
अगदी आनंदाने केले

About drsubhash27

Doctor...Great Fan of Mukesh. My Inspiration is my cute Daughter Anuja.
This entry was posted in आयुष्यावर कविता / Aayshyavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, वेगळी कविता II Vegali Kavita and tagged , , , , . Bookmark the permalink.

Leave a comment