मनातले अभद्र विचार…I Manatale abhadra Vichar I Poem on Social Issue

सुंदर अश्या नैसर्गिकतेकडे 
डोळे तुमचे वळणार रे 
पण मनातल्या अभद्र विचारांना 
घाला तुम्ही लगाम रे 
पैहरावाला विनाकारण 
का दोष सारे लावता ?
असते महाभयंकर 
डोळ्यांची ती पारदर्शकता 
मनाची सुंदरता तुम्हाला 
कधी कळणार रे ?
मनातल्या अभद्र विचारांना 
घाला तुम्ही लगाम रे 
तुमच्याच सोयीने असते 
का रे ती अनैतिकता 
कधी बदलणार तुमची 
बुरसटलेली मानसिकता 
अजुन किती दिवस तुम्ही 
स्त्रित्वाला छळणार रे ?
मनातल्या अभद्र विचारांना 
घाला तुम्ही लगाम रे 
स्त्रीला कळते आपसुकच 
आरपार ती नजर 
खूप केले आहे सहन 
तिनं रे आजवर 
भावनांशी तिच्या तुम्ही 
अजुन किती खेळणार रे ?
मनातल्या अभद्र विचारांना 
घाला तुम्ही लगाम रे 
विधात्याची सुंदर भेट 
तनाची ती सुंदरता 
नर आणि मादी 
क्षणिक ती भावना 
निर्मळ ती मानवता 
कधी तुम्हा उमजणार रे ?
मनातल्या अभद्र विचारांना
घाला तुम्ही लगाम रे 

रचनाडॉ. सुभाष कटकदौंड 

About drsubhash27

Doctor...Great Fan of Mukesh. My Inspiration is my cute Daughter Anuja.
This entry was posted in मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, सामाजिक आशयाच्या कविता / Samajik Kavita and tagged , , , , , . Bookmark the permalink.

Leave a comment