शब्दांचे बदलते रंग I शब्दांवर कविता I Poem on Words

आवाजाच्या चढउताराला 
होते ते घाबरले 
सरल साध्या शब्दांचे 
रंग होते बदलले 

शब्दांना ज्यांनी त्यांनी 
हवे तसे जोडले 
जसे हवेत तसे 
अर्थ त्यांनी काढले 

कधी संतापुन शब्दांकडे 
रागाने मी बघितले 
बिथरले ते बिचारे 
ओळख स्वतःची विसरले 

सरल साध्या शब्दांनी 
रंग होते बदलले 
कधी नकळत जिभेवरुन 
शब्द होते घसरले 

भात्यातुन सुटलेले बाण ते 
विध्वंस करत पसरले 
विवश होउन कधी 
शब्द होते ते गहिवरले 

वाटलं होतं तेंव्हा जणु
संवाद सारे संपले 
ओळखीचे सारे शब्द 
अपरिचित तेंव्हा भासले  

सरल साध्या शब्दांचे 
रंग होते बदलले 
निष्ठूरपणे कधी मी 
शब्द फेकुन मारले 

उलटुन आलेले शब्द 
मला धार धार वाटले 
कळलं नाही कसे 
शब्द मी तोडले 

जन्मा जन्मीचे नाते 
विनाकारण मोडले 
सरल साध्या शब्दांनी
अर्थ होते बदलले 

सरल साध्या शब्दांचे 
रंग होते बदलले  
माफीचे शब्द मला 
नाही शोधुन सापडले 

कळलं नाही कसे ते 
अहंकाराच्या मागे लपले 
ओठांवरचे शब्द 
ओठांवरच रेंगाळले 

विरहात शब्द गळ्याशी 
घुटमळत राहिले 
उदास शांत शब्द 
निशब्द मला भासले 

सरल साध्या शब्दांचे 
रंग होते बदलले  

प्रेमाने बोललो तसे 
शब्द जवळ बसले 
निरागस ते तेंव्हा 
ह्रुदयात होते हसले 

शब्दांची स्तुती सुमने 
मी इतरांवर उधळले 
गंधानी त्यांच्या 
मन माझे मोहिले 

सरल साध्या शब्दांचे 
अर्थ होते खुलले  
सरल साध्या शब्दांचे 
रंग होते फुलले 

रचना – डॉ. सुभाष कटकदौंड – खोपोली 

About drsubhash27

Doctor...Great Fan of Mukesh. My Inspiration is my cute Daughter Anuja.
This entry was posted in उर्जावान कविता / Aanadi Kavita, वेगळी कविता I Different Poem, वेगळी कविता II Vegali Kavita and tagged , , , . Bookmark the permalink.

Leave a comment