तुझ्याविना जीवन I Emotional Poem for Life Partner

सोबत जगलो दोघं 
मरण नाही चुकले कुणाला 
पण तुझ्याविना जीवन 
नाही कल्पवत ग मनाला

स्वभाव माझा चिडका 
दोष देऊ कुणाला 
हसत पित राहिलीस तू 
अपमानाचा प्याला 
नाही समजु शकलो मी
निर्मळ तुझ्या मनाला 
आता तुझ्याशिवाय जीवन 
नाही कल्पवत ग मला

तू नेहमी साथ दिलीस 
स्वप्नं माझी रंगवायला 
हात कमी पडले माझे 
दूःख तुझं सावरायला 
तू नेहमी घेतलंस ओंजळीत
खचलेल्या माझ्या मनाला
आज तुझ्याशिवाय जीवन 
नाही कल्पवत ग मला

तू पहात होतीस नेहमी 
उगवत्या प्रसन्न सूर्याला 
मी न्याहाळायचो मनी 
मावळत्या त्या चंद्राला 
तुला कधी उदास पाहुन 
यातना होतात ग मनाला 
आता तुझ्याशिवाय जीवन 
नाही कल्पवत ग मला

विसर राणी तू आता 
कडव्या त्या क्षणाला 
तू नेहमी दिलेस बळ
माझ्या या जगण्याला 
तुझ्यानंतर कोण सावरेल 
हळव्या माझ्या मनाला 
तुझ्याविना हे जीवन 
नाही कल्पवत ग मला

नियतीचे ते विधान 
नाही चुकले ग कुणाला 
तुझ्याविना काहीच अर्थ 
नसेल माझ्या असण्याला 
माझ्यातलं थोड आयुष्य 
लाभु दे ग तुला 
तुझ्याआधी ने मला 
हेच मागणं त्या देवाला 
तुझ्याविना हे जीवन 
नाही कल्पवत ग मनाला 
नाही कल्पवत ग मनाला

रचना – डाॅ. सुभाष कटकदौंड – खोपोली 

About drsubhash27

Doctor...Great Fan of Mukesh. My Inspiration is my cute Daughter Anuja.
This entry was posted in नवरा बायकोवर कविता / Navara bayakovar Kavita, पती पत्नीच्या स्नेहाच्या कविता / Pati patnichya snehachya kavita, प्रेम कविता / Prem Kavita, बायकोवर कविता / Poems on Wife, भावनिक कविता - Emotional Poems and tagged , , , , . Bookmark the permalink.

9 Responses to तुझ्याविना जीवन I Emotional Poem for Life Partner

  1. Vinod says:

    I like this poem sir

    Like

  2. mohini samudre says:

    its very heart touching poem …..keep it up …

    Like

  3. Sahil ghasti says:

    खूप भारी आहे तुमची कविता ।।।।मला आवडली मी यावर एक ऑडिओ बनवू इच्छितो

    Like

  4. दिपक मेश्राम says:

    मला खुप आवडल कविता खुप सुंदर 👌👌👌👌😊

    Like

  5. kundlik panchal says:

    lay bhari poyam aahe madamji…..mast kavita aahe

    Like

  6. kundlik panchal says:

    sory sir ji….mast kavita aahe

    Like

  7. Jayant says:

    कविता खूप सुदंर आहे, शब्दांचे अर्थ, केलेली शब्दरचना छान आहे

    Like

Leave a comment