प्रेमानं तुझ्या केलं वेडं I Poem of Love I प्रेम कविता

माझ्या मनाला मला 
नाही आलं आवरता 
वेडं केलं प्रेमानं तुझ्या 
नाही आलं सावरता

जेंव्हा जेंव्हा तुझ्याकडे 
मी होते पाहिले 
सौंदर्य ते डोळ्यात माझ्या 
नव्हते ग मावले 
वेगळी ती माझी नजर 
तुला आली ओळखता 
तू दिलीस कबुली प्रेमाची 
नजर ही न वळवता 
वेडं केलं प्रेमानं तुझ्या 
नाही आलं सावरता

प्रयत्न तू करत होतीस 
पण लाज नाही लपली गाली 
हसलीस तेंव्हा अर्ध हास्य 
ओठांतुन पडलं खाली 
खाली पडणार हास्य तुझं 
मला नाही आलं झेलता 
गेलेला तो तोल माझा 
नाही आला सांभाळता 
वेडं केलं प्रेमानं तुझ्या 
नाही आलं सावरता

होतीस लपवत आलेल्या 
ओठांवरच्या त्या शब्दांना 
डोळ्यातुन तुझ्या झळकल्या 
लपलेल्या त्या भावना 
बघत राहिलीस माझ्याकडे 
तू थोडीही न बावरता 
तुला बिलगलो मनानं मी 
जरा ही न ओशाळता 
वेडं केलं प्रेमानं तुझ्या 
नाही आलं सावरता
माझ्या मनाला मला 
नाही आलं आवरता 
वेडं केलं प्रेमानं तुझ्या 
नाही आलं सावरता

Written by Dr Subhash Katakdound 

About drsubhash27

Doctor...Great Fan of Mukesh. My Inspiration is my cute Daughter Anuja.
This entry was posted in प्रेम कविता / Prem Kavita, Uncategorized and tagged , , . Bookmark the permalink.

3 Responses to प्रेमानं तुझ्या केलं वेडं I Poem of Love I प्रेम कविता

  1. दत्तात्रय शेलार says:

    सर सर्वच कविता सुंदर आहेत👌👌👌खुप खुप छान

    Like

  2. दिपक मेश्राम says:

    खुप सुंदर कविता

    Like

  3. Kunal says:

    Very nice

    Like

Leave a comment