दूःख तिचे I Dukhh Tiche I Sad Sentimental Poem

दूःख तिचं जाणणारे 
होते जेंव्हा दुरावले
तिच्या दूःखी मनाला 
तिनेच होते सावरले 
रूसलेले डोळे तिचे 
हास्य होते विसरले 
दूःख कोरड्या डोळ्यातले 
नाही कोणा दिसले 
जवळचे ते सारे 
अपरिचित तिला भासले 
तिच्या दूःखी मनाला 
तिनेच होते सावरले 
मनातलं दूःख तिनं 
नाही ओठांवर आणले 
गालावरच्या हास्यात 
वेदनेला खोल लपवले 
चेहऱ्यावरचे सारे भाव 
होते तिने मिटवले 
तिच्या दूःखी मनाला 
तिनेच होते सावरले 
जुन्या त्या आठवणींनी 
डोळे होते भरले 
न ओघळणारे अश्रु 
डोळ्यातच होते मुरले 
जड झालेले डोळे तिने
अलगद शांत मिटले 
तिच्या दूःखी मनाला 
तिनेच होते सावरले 
तुटलेले सुंदर स्वप्न 
मन नव्हते विसरले 
कोलमडलेले आयुष्य 
धिराने तिने उभारले 
दूःख तिचं जाणणारे 
जवळ तिच्या बसले 
तिचे वाहणारे अश्रु 
मग नाही तिने पुसले

रचना – डाॅ. सुभाष कटकदौंड – खोपोली 

About drsubhash27

Doctor...Great Fan of Mukesh. My Inspiration is my cute Daughter Anuja.
This entry was posted in दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems, मनावर कविता / Poems on mind, मानवी स्वभावावर कविता / Poems on Human behavior, विरह कविता / Virah Kavita and tagged , , , , , . Bookmark the permalink.

2 Responses to दूःख तिचे I Dukhh Tiche I Sad Sentimental Poem

  1. मिलिंद पोळ says:

    सर्वच कविता खूप छान.

    Like

Leave a comment