अस्तित्व II Presence

अस्तित्व… 
Written by Dr Subhash Katakdound

अस्तित्व कसं दिव्यामधल्या 
ज्योतीप्रमाणे असतं
किती तेल शिल्लक राहिले 
ते त्याला माहित नसतं

अस्तित्वाला कसं मनाच्या 
कानोस्यात सुरक्षित वाटतं 
कधी अचानक साध्या हवेच्या 
झुळूकीने ही ते बुझतं

अस्तित्व तनाच्या देव्हाऱ्यात 
आनंदाने उजळतं 
जिवलगांच्या आयुष्यात 
ते प्रेमानं प्रकाशतं

अस्तित्व कसं दिव्यामधल्या 
ज्योतीप्रमाणे असतं
साथ देणाऱ्या वातीला 
विरहात सोडून जातं

अस्तित्व कसं दिव्यामधल्या 
ज्योतीप्रमाणे असतं
पार्थिवाजवळ आत्म्याच्या 
रूपाने ते तेवतं

अस्तित्व कसं आठवणी 
मागे सोडून विझतं 
काजळीच्या खुणांनी 
दिव्याभोवती चिकटतं

विझलेल्या दिव्याच दूःख 
काही काळच टिकतं
नव्या ज्योतीनं नव अस्तित्व 
पुन्हा जन्माला येतं

Written by Dr Subhash Katakdound 
Khopoli – 9561284408 
Date – 5th September 2017 

About drsubhash27

Doctor...Great Fan of Mukesh. My Inspiration is my cute Daughter Anuja.
This entry was posted in आयुष्यावर कविता / Aayshyavar Kavita, दुःखावर कविता / Dukhavar Kavita, भावनिक कविता - Emotional Poems and tagged , , , , , . Bookmark the permalink.

Leave a comment